Sunday, September 02, 2018

कर्ज मिळविण्यासाठी गुगलही करणार आता मदत

कर्ज मिळविण्यासाठी गुगलही करणार आता मदत 

जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या गुगलने नुकतीच एका महत्त्वाच्या गोष्टीची
घोषणा केली आहे.

सामान्यांना कधी घर घेण्यासाठी, कधी गाडी घेण्यासाठी तर कधी शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळी आता गुगल मदतीला धावून येणार आहे.

विशेष म्हणजे हे लोन तुम्हाला घरबसल्या मिळू शकणार आहे. गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट या कंपनीकडून ही सुविधा दिली जाणार आहे.

यासाठी अल्फाबेटने 4 भारतीय बँकांशी करार करणार आहे. त्यामुळे आता कर्ज मिळण्याचा सोपा आणि चांगला पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

यामध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि फेडरल बँकयांचा समावेश आहे.
यासाठी फार मोठी प्रक्रिया नसून काही सेकंदांमध्ये हे कर्ज मान्य होणार असल्याचेही गुगलकडून सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment